कुख्यात गजा मारणे टोळीतील गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत कारवाई

0

पुणे : कुविख्यात गुन्हेगार गजा मारणे उर्फ महाराज याच्या टोळीतील गुन्हेगार पप्पू उर्फ अविनाश वसंत कडू (36, रा. गल्ली नं. 4, म्हातोबानगर, कोथरूड, पुणे) यांच्यावर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

कुख्यात गुंड गजा मारणे टोळीतील पप्पू उर्फ अविनाश वसंत कडू याच्यावर वेळावेळी प्रतिबंधात्मक कारवाई  करून सुध्दा त्याच्या वर्तनात काहीही सुधारणा होत नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. कडू याने त्याच्या साथीदारांसह कोथरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये कोयता, सत्तूर, सुर्‍या सारख्या घातक व जीवघेण्या हत्यारांसह खून, खूनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मारामारी, जाळपोळ करून नुकसान करणे तसेच सरकारी कामात अडथळा आणणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत. कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, पीसीबी (गुन्हे) वरिष्ठ निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी गुन्हेगाराच्या रेकॉर्डची पडताळणी केली. पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्याकडून पप्पू कडू याच्यावर स्थानबध्दतेची कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविला होता.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पप्पू उर्फ अविनाश वसंत कडू याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात  एक वर्षासाठी रवानगी केली आहे. मागील वर्षभरात आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी 56 गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्यांना स्थानबध्द केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.