पिंपरी : मंत्रालयात ओळख असल्याचे सांगत नामंजूर झालेला हत्यार परवाना मंजूर करून देतो असे आमिष दाखवले. त्यापोटी दहा लाख रुपये स्विकारुन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पाषाण परिसरात 2018 रोजी हा प्रकार घडला.
याप्रकरणी योगेंद्र रतीलाल गांधी (54, रा. वानवडी, पुणे) यांनी शुक्रवारी (दि.18) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार माधव भुजंगराव गवळी (35, रा. चिपळूण, रत्नागिरी) याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना मंत्रालयात ओळख असल्याचे सांगितले व नामंजूर झालेला हत्यार परवाना मंजूर करून देतो असे आमिष दाखवले. त्यासाठी सुरुवातीला पाच व परवाना मंजूर झाल्याचे सांगून पाच असे एकूण दहा लाख रुपये स्विकारुन फसवणूक केली. असे फिर्यादीत नमूद केले आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.