पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करुन नंतर लग्नास नकार देणार्या पोलीस अंमलदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमिज मुल्ला (३०, रा. शिवाजीनगर पोलीस लाईन) असे या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. याप्रकरणी कोंढव्यातील एका ३० वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार लवासा, लोणावळा, ब्रम्हा आंगण सोसायटी येथे २०१७ पासून ५ फेब्रुवारी २०२२ दरम्यान घडला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार रमिज मुल्ला हा सध्या कोंढवा पोलीस ठाण्यात नेमणूकीला आहे.
त्याने कोंढव्यातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. त्यानंतर लग्नास नकार दिला. सर्व ठिकाणी फिर्यादीला ही माझी बायको, असे सांगून फिर्यादी यांची बदनामी केली. त्यामुळे त्यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक गपाट तपास करीत आहेत.