मनसेच्या कार्यक्रमाच्या वेळी स्टेज कोसळला; राज ठाकरे होते उपस्थित

0

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गोरेगावातील कार्यक्रमाचा स्टेज कोसळला आहे. या दुर्घटनेमध्ये अनेक महिला अडकल्या असल्याचीही माहिती मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही स्टेजवर उपस्थित होते.

गोरेगावात मनसेच्या शाखेचे उदघाटन होते. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते या शाखेचे उदघाटन करण्यात आले आहे. राज ठाकरे स्टेजवर येत असताना कार्यकर्त्येही स्टेजवर आले.

एकाच वेळी जास्त कार्यकर्त्ये स्टेजवर आल्यामुळे स्टेज कोसळल्याची घटना घडली आहे. स्टेजचा मधला भाग खचल्याने या घटनेत महिला स्टेजमध्ये अडकल्या असल्याची माहिती मिळत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत महिलांना बाहेर काढण्याचे मदतकार्य सुरु केले आहे. यावेळी कोणतीही जीवित हानी किंवा अनुचित प्रकार घडला नाही.

राज ठाकरे यांनी घटनेच्या नंतर स्टेजच्या पुढे जाऊन कार्यक्रम सुरु केला. मनसेच्या या कार्यक्रमात तुफान गर्दी पाहायला मिळाली.

राज ठाकरे यांनी यावेळी मनसे कार्यकर्त्यांना तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.