पिंपरी : गरजू आणि पैशाअभावी होतकरू मुलींचे पात्रता असूनही शिक्षण खंडित होऊ नये यासाठी काम करणाऱ्या संस्थेस पुनावळे येथील प्रतिथयश उद्योजक व अधिरा इंटरनॅशनल स्कुल चे संस्थापक अध्यक्ष नवनाथ ढवळे यांनी मदत केली आहे.
ओम प्रतिष्ठानचे कार्य ढवळे यांनी समजून घेतले. गरजू आणि पैशाअभावी होतकरू मुलींचे पात्रता असूनही शिक्षण खंडित होऊ नये यासाठी ओमप्रतिष्ठान विद्यादान योजनेच्या माध्यमातून कार्य करते. यासाठी आजपर्यंत महाराष्ट्रभरात ३० मुलींचे पालकत्व ओम प्रतिष्ठान विद्यादान योजनेंने घेतले आहे.
याच कार्याने प्रेरित होऊन गरीब आणि गरजू मुलींचे शिक्षण पैश्याअभावी खंडित होऊ नये यासाठी उदयोजक व सामाजिक कार्यकर्ते श्री नवनाथ ढवळे यांनी मदतीचा धनादेश आज ओम प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सोनल पाटील व सचिव विद्या महाजन यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी ओम प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष वनिता ताई सावंत उपस्थित होत्या. समाजातील प्रत्येकाने सामाजिक बांधिलकीतून आपण ज्या समाजात वाढलो, ज्या समाजाने आपल्याला घडविले त्या समाजाला आपण काहीतरी देणं लागतो या भावनेने समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे आणि सर्वानी हे कार्य केल्यास समाजात नक्कीच प्रगती होणार आहे म्हणूनच गरीब मुलीच्या शिक्षणासाठी मी माझे छोटेसे योगदान देत आहे असे नवनाथ ढवळे यांनी सांगितले.