दिशा सॅलियनला घरी सोडणारी कार सचिन वाझेची?

0

मुंबई : भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी अभिनेता सुशांत सिंहची मॅनेजर दिशा सॅलियनबाबत एक ट्विट केले आहे. या ट्विटमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पार्टीच्या दिवशी रात्री दिशा सॅलियन ज्या कारने घरी गेली, ती कार सचिन वाझेची आहे का, असा दावा राणेंनी केला आहे. 

नितेश राणे यांनी केवळ एकच ट्विट केले नाही तर एकामागून एक ट्विट करत त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. पहिल्या दिवसापासून मालवणी पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. दिशा सॅलियन प्रकरणात आता त्यांना अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. ८ तारखेच्या रात्री उपस्थित असणारा आणि दिशा सोबत राहणारा रोहित राय काहीच का बोलत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

Disha was apparently taken 2 her Malad home in a black Merc on the 8th night from the party..Sachin Waze also owned a black Merc which is with the investigation agencies now..
Is it the same car?
he was reinstated in the police department on the 9th of June..
Connection? 

— nitesh rane (@NiteshNRane) February 22, 2022


अन्य एका ट्विटमध्ये नितेश राणे म्हणतात की, महिला आयोग आणि मालवणी पोलिसांना मुंबईच्या महापौरांनी पत्र लिहून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. याचा अर्थ असा की, ८ जूनच्या रात्री काहीच घडले नाही असे दाखवण्याची राज्य सरकारकडून मोठी तयारी सुरु आहे. ते किमान आपली कबर खोदत आहे याचा आंनद तरी आहे अशी टीकाही त्यांनी केली. त्याच रात्री म्हणजे ८ तारखेला काळ्या मर्सिडीजमधून दिशाला तिच्या मालाडच्या घरी नेण्यात आले. सचिन वाझेकडेही काळी मर्सिडीज आहे जी सध्या तपास यंत्रणांकडे आहे. 

ही तीच कार आहे का? ९ जूनला त्याला पुन्हा पोलीस खात्यात रुजू करण्यात आले. संबंध? अशी एक शंका नितेश राणे यांनी उपस्थित केली. मालवणी पोलिसांनी तपास योग्य केला नाही म्हणून तो सीबीआयकडे देण्यात आला. बरोबर ना ? आणि आता महिला आयोगाने याच पोलिसांना अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे? हे किती योग्य आहे? नेमके कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 

Mumbai mayor writes 2 state women commission n then she writes 2 Malvani pol station 2 gv a report abt Disha Salian case..
So a grand cover up is planned 2 show nothing happened on the 8th of June night by the state gov..
Chalo I m glad finally they r digging their own grave! 

— nitesh rane (@NiteshNRane) February 22, 2022 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिशा सॅलियनबाबत पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बदनामीकारक वक्तव्य केले होते. त्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी कारवाई करण्याची मागणी महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे केली होती. 

त्या मागणीची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दाखल घेऊन पोलिसांना ४८ तासांत अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. स्वतः रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून ही माहिती दिल्याने राणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.