नगरपरिषदांचे बिगूल वाजले; प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहिर

0

मुंबई : महाराष्ट्रातील मे 2020 ते मार्च 2022 दरम्यान मुदत संपलेल्या व संपत असलेल्या अ वर्गातील 16, ब वर्गातील 68 व क वर्गातील 120 तर नवनिर्मित 4 अशा 208 नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे. यामुळे पुढील एप्रिल, मे महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता बळवली आहे.

आगामी निवडणुका ह्या दोन सदस्य प्रभाग पद्घतीने होणार असून किमान व कमाल सदस्य संख्या याबाबत मागील काळात शासनाने सुचित केले आहे. सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रल्बिंत असल्याने आरक्षण सोडतीची प्रक्रिया मागे ठेवत प्रभाग रचना पुर्ण करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी प्रभाग रचना कार्यक्रम प्रसिद्ध केला आहे.

अ) प्रारुप प्रभाग रचना कार्यक्रम

1} प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव (नगर परिषदांच्या प्रभागांची संख्या, त्यांची प्रभागनिहाय एकूण व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीची 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन व नकाशा यासह) जिल्हाधिकारी यांचेकडे मुख्याधिकारी यांनी सादर करणे – 02/03/2022 बुधवार पर्यत

2} प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता देणे. – जिल्हाधिकारी 07/03/2022 सोमवार पर्यत

ब) हरकती व सूचना तसेच सुनावणी

1} प्रारूप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे (अधिसूचना कलम १० नुसार) रहिवाश्यांच्या माहितीसाठी व हरकती तसेच सूचना मागविणेकरिता वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगर परिषदांच्या वेबसाईटवर प्रसिध्द करणे – जिल्हाधिकारी 10/03/2022 (गुरुवार) पर्यंत

2} हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी – 10/03/2022 (गुरुवार) ते 17/03/2023 (गुरुवार) पर्यंत

3} प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी देणे. – जिल्हाधिकारी – 22/03/2022 (मंगळवार) पर्यत

4} हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन राज्य निवडणूक आयुक्त यांचेकडे अहवाल पाठविणे – जिल्हाधिकारी 25/03/2022 (शुक्रवार) पर्यत

5} अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देणे. – राज्य निवडणूक आयुक्त – 01/04/2022 (शुक्रवार) पर्यत

क) अंतिम प्रभाग रचना

(प्रभाग निहाय एकूण लोकसंख्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची लोकसंख्या)

१. अधिनियमातील कलम 10 नुसार अंतिम अधिसूचना जिल्हाधिकारी वृत्तपत्रात व स्थानिकपातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपरिषदांच्या वेबसाईटवर प्रसिध्द करणे. – जिल्हाधिकारी – 05/04/2022 (मंगळवार) पर्यंत.

Leave A Reply

Your email address will not be published.