मुंबई : भाजप आणि महाविकास आघाडीमधील सरकारमध्ये आरोप- प्रत्यारोप होताना आपण पाहत असतो. मात्र राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे ED च्या कोठडीत आहेत. मात्र यावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं आहे. मलिक यांचे दाऊदसोबत संबंध असल्याची टीका भाजपचे नेते करत आहेत. मात्र अशातच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी थेट भाजपवर निशाणा साधला आहे. नाथाभाऊंनी थेट भाजपला फंड पुरवणाऱ्या एका दहशतवाद्याचं नाव सांगितलं आहे.
भाजपने नवाब मलिकांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी केली आहे. मात्र भाजपला इक्बाल मिरचीने फंड पुरवला होता. इक्बाल मिरची हा दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. त्यासोबतच भाजप नेते गिरिश महाजन यांनी नाशिकमध्ये दाऊदच्या नातेवाईकासोबत जेवण केलं म्हणजे त्यांचा दाऊदच्या नातेवाईकासोबत संबंध आहेत असं म्हणता येईल का?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे.
इक्बाल मिरचीकडून तुम्ही पक्षासाठी फंड घेता आणि या ठिकाणी व्यवहार झाला म्हणून बोलता हे काय आहे. भाजपने आपली भूमिका स्पष्ट करायला हवी, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.