खेड-शिवापूर टोल नाक्यावर MH12 आणि MH14 वाहनांसाठी टोल भरावा लागणार

0

पुणे : पुणे – सातारा रस्त्यावरील खेड – शिवापूर टोल नाक्यावर एमएच -12 आणि एमएच – 14 या वाहनांची टोलमाफी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बंद केली आहे. पुणे – सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाची कामे  पूर्ण झाल्याने आम्ही ही टोलमाफी बंद करत आहोत. 1 मार्चपासून या वाहनांना खेड – शिवापूर टोलनाक्यावर टोल आकारण्यात येत आहे, असे NHAI कडून सांगण्यात आले आहे.

पुणे – सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाची रखडलेली कामे वेळेत पूर्ण करावीत आणि खेड शिवापूर टोलनाका पीएमआरडीएच्या हद्दीबाहेर हलवावा या मागणीसाठी खेड – शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीच्या वतीने तीन वर्षापूर्वी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी या मागण्यांबाबत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत हवेली (पुणे शहर – पिंपरी चिंचवड), भोर, वेल्हा, मुळशी आणि पुरंदर या पाच तालुक्यातील वाहनांना टोलमाफी दिली जाईल, असे लेखी आश्वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आले होते. तेव्हापासून खेड – शिवापूर टोल नाक्यावर या पाच तालुक्यातील वाहनांना टोल माफ करण्यात आला होता. परंतु 1 मार्च पासून खेड – शिवापूर टोल नाक्यावर MH – 12 आणि MH – 14 वाहनांना टोल आकारण्यास सुरुवात झाली आहे.

यासंदर्भात टोल रोडच्या अधिकार्‍यांनी सांगितले, रस्त्याची कामे पूर्ण झाली असून वाहतुकीस कुठेही अडथळा होत नाही.
त्यामुळे एमएच – 12 आणि एमएच – 14 वाहनांकडून टोल आकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
रस्त्याची कामे पूर्ण झाली असून टोल द्या अशी आम्ही वाहनचालकांना विनंती करत आहोत. तर टोलनाका पुढे हटविण्याचा निर्णय वरिष्ठपातळीवर घेतला जाईल, याचा टोलमाफीशी काहीही संबंध नाही.

तर रस्त्याची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे एमएच – 12 आणि एमएच – 14 वाहनांकडून टोल आकारण्यात येत आहे.
तसेच स्थानिक नागरिकांच्या वाहनांसाठी मासिक पास उपलब्ध आहेत, असे NHAI च्या जनसंपर्क विभागाकडून  सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.