पंजाब मध्ये आम आदमी पक्ष पूर्ण बहूमताकडे

0

अमृतसर : आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये पूर्ण बहुमत मिळताना दिसतं असून तब्बल ८७ जागांवर पक्ष आघाडीवर आहे. तर सत्ताधारी काँग्रेसला अवघ्या १४ जागांवर आघाडी मिळाली आहे. भाजपला अवघ्या ४ जागांवर आघाडी घेता आली आहे. भाजपचा जुना साथीदार आणि एकेकाळचा सत्ताधारी असलेला शिरोमणी अकाली दल अवघ्या १० जागांवर यशस्वी होताना दिसत आहे.

काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हे दोन्ही मतदार संघातून पिछाडीवर आहेत. चमकौर साहिबमधून चन्नी यांना २३ हजार ५४७ मत आहेत. तर आम आदमी पक्षाचे उमेदवार चरणजीत सिंग हे २४ हजार ७९१ मतांसह आघाडीवर आहेत. तर दुसऱ्या भदौर मतदारसंघातून चन्नी यांना ७ हजार ८९५ मत मिळाली आहेत. इथे त्यांच्या विरोधातील आम आदमी पक्षाचे उमेदवार लाभ सिंह यांना १४ हजार २२९ मत मिळाली आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातून चन्नी जवळपास पराभवाच्या छायेत आहेत.

याशिवाय आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान यांची ४३ हजार ८९८ मतांसह विजयाकडे वाटचाल सुरु आहे. तर त्यांच्या विरोधातील काँग्रेस उमेदवार दलविरसिंग गोल्डी यांना १४ हजार १९१ मत मिळाली आहेत. त्यामुळे आता पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार येणार असून भगवंत मान हे मुख्यमंत्री होणार हे जवळपास अंतिम झाले आहे. नेमकी हिच गोष्ट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक महिन्यापूर्वी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात जाहिर रित्या लिहून दिली होती. शिवाय केजरीवाल यांनी ट्विटरवरुन देखील हि गोष्ट सांगितली होती.

अरविंद केजरीवाल यांनी चन्नी यांना काँग्रेसने दोन मतदार संघात उभे करण्याचा निर्णय आपण वर्तवलेल्या अंदाजानंतर घेतला असल्याचे म्हटले होते. काँग्रेसने चन्नी यांना दोन मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटले होते की, सर्वेक्षणानुसार चमकौर साहिबमधून चन्नी निवडणूक जिंकणार नाहीत. आज काँग्रेसने त्यांना दोन जागांवर उमेदवारी घोषित केली आहे. म्हणजे सर्वेक्षण खरे होते? असा सवाल त्यांनी विचारला आहे. अरविंद केजरीवाल यांनी २१ जानेवारी रोजी ट्विट करुन म्हटले होते की, मी सकाळीच बोललो होतो, चन्नीजी चमकौर साहिब मधून निवडणूक हारणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.