शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्या अडचणीत वाढ

0

पुणे : शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांनी बलात्कार करून जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान रघुनाथ कुचके यांच्यावर फेसबुक वर आरोप करून बेपत्ता झालेली पीडित तरुणी अखेर गोव्यात सापडली आहे. याबाबत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सोशल मीडिया वरून माहिती देतानाच पुणे पोलिसांवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. 

चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटरवरून सांगितले की दोन दिवसांपासून ही बेपत्ता तरुणी गोवा मडगावच्या कलवा गावात सापडली. काल रात्री तिचा मला फोन आला होता. इंजेक्शन देऊन काही व्यक्ती ज्यात पोलीसही होते त्यांनी पीडितेला महाराष्ट्रातून नेल्याची धक्कादायक माहिती तिने मला दिली. यासंदर्भात मी पुणे पोलिसांना सविस्तर कळवले आहे.

पीडित मुलगी ही 24 वर्षांची आहे. शिवसेना नेता रघुनाथ कुचिक याने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला आणि त्यानंतर जबरदस्तीने गर्भपात केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. 17 फेब्रुवारीला शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आपल्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने पीडित तरुणीने काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, परंतु पोलिसांनी वेळीच धाव घेऊन त्याची समजूत काढली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.