पुणे : पुणे शहरामध्ये अवैध सावकारी करुन खंडणी मागणाऱ्यांवर पुणे पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. पुणे पोलिसांच्याखंडणी विरोधी पथक एकच्या पथकाने तीन खासगी सावकारांना अटक केली आहे. आरोपींनी तक्रारदार यांच्याकडे खंडणी मागून जीवेमारण्याची धमकी दिली होती. आरोपींना सापळा रचून त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे.
व्यंकटेश नागेंद्र चोक्कारपू (52, रा. 13/3 लिला निवास, साई सत्यम पार्क, वाघोली ), शांतीलाल देवराम पाटील (59, रा. लेन नं.6, साई सत्यम पार्क, वाघोली), वसंत कुमार राममिलन मिश्रा (56, रा. घर नं 1247, साई सत्यम पार्क, लेन नं.7 वाघोली) अशी अटककरण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरात अवैध सावकारी करणाऱ्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसारखंडणी विरोधी पथक एकच्या पथकाने तिघांना अटक केली आहे. तक्रारदार यांनी सुभाष मांडोळे, व्यंकटेश चोक्कारपू व इतरांविरुद्धअवैध सावकारी करुन खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद लोणीकंद पोलीस ठाण्यात दिली होती. तक्रारीचीचौकशी करुन पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पुढील तपास खंडणी विरोधी पथक एक चे पोलीस उपनिरीक्षक विकास जाधवकरीत आहेत.