पुणे : रस्त्याने जाणार्या 12 वर्षाच्या तरुणीला जबरदस्तीने उचलून नेवून, तिच्यावर अत्याचार केल्याची घटना दत्तवाडी, पुणे परिसरात घडली आहे.
याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी अस्लम शौकत शेख (२१, रा. कांदेआळी, जनता वसाहत) याला अटक केली आहे. याप्रकरणी १२ वर्षाच्या मुलीच्या वडिलांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्लम शेख हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. शेख हा १२ वर्षाच्या मुलीला धमकावून तिच्यासोबत वेळोवेळी जबरदस्तीने शरीर संबंध ठेवत होता. १७ मार्च रोजी रात्री ही मुलगी घरी जात होती.
यावेळी अस्लम शेख याने या मुलीचे तोंड दाबून तिला ओढत जबरदस्तीने आपल्या घरात नेले. घरातील बाथरुममध्ये तिच्या अत्याचार केला. दत्तवाडी पोलिसांनी शेख याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.