कोट्यवधींची फसवणूक प्रकरण; बांधकाम व्यवसायिक अगरवाल याच्यासह तिघांना पोलीस कोठडी

0

पिंपरी : बांधकाम व्यवसायिक आगरवाल यांच्या किवळे परिसरात सुरु असलेल्या बांधकाम साईटसाठी श्री साई रियालिटी, श्री साई इन्फोटेक व श्री. साई बिल्डटेक नावाच्या संस्थामध्ये गुंतवणूक केलेल्या भागीदाराची फसवणूक केली आहे. यामध्ये 1 कोटी 30 लाख रुपयांची गुंतवणूक केली असून नफा सुमारे 4 कोटी रुपये येणार असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अटक केलेल्या तिघांना न्यायाधिशांनी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणी संदीप दीनदयाल अगरवाल, सचिन दीनदयाल अगरवाल आणि सुमीत दीनदयाल अगरवाल तिन्ही बांधकाम व्यवसायिकांना देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी सोमवार प्रयत्न पोलीस कोठडी सुनावली आहे. तर कपिल सतपाल अगरवाल याच्यावर गुन्हा दाखल असून त्याचा शोध सुरु आहे. रोहिदास शामराव तरस (४३, रा.विकासनगर, किवळे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; अगरवाल याच्या किवळे परिसरात बांधकाम साईट सुरु आहेत. या साईटसाठी अगरवाल यानी श्री साई रियालिटी, श्री साई इन्फोटेक व श्री. साई बिल्डटेक नावाच्या संस्था सुरु केल्या. या संस्थामध्ये तरस यांना भागीदारी दिली. त्यासाठी त्यांच्याकडून 1 कोटी 30 लाख रुपयांची भांडवल घेतले. तरस यांच्याप्रमाणे विनय दीनदयाल गुप्ता आणि सागर वेदप्रकाश गुप्ता या दोघांनाही भागीदार म्हणून घेतले.

अगरवाल यांनी तरस यांना फसविण्याच्या उद्देशाने सुरुवातीपासून खोटे कागदपत्रे तयार केली. तरस यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करुन विनय गुप्ता आणि सागर गुप्ता या दोघांना निवृत्त झाल्याचे ‘डिड ऑफ रिटायरमेंट’ ची कागदपत्रे करुन दिली. अगरवाल यांनी या प्रकल्पातील (साईट) अनेक गाळे, सदनिका विक्री करुन पैसे स्वतःकडे ठेवले. यातील तरस यांच्या हिस्साचा सुमारे नफा 4 कोटी नफा येणे बाकी आहे. याबाबत तरस यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर तिघांना अटक केली आहे.

अटक केल्यानंतर त्यांना वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले असता सोमवार प्रयत्न पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज कोठडी संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायाधीशांनी आणखी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास देहूरोड पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.