मुंबई : अंगडिया व्यवसायिकांकडून खंडणी वसुली प्रकरणात आरोपी असलेल्या आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांना निलंबित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी निलंबनाच्या प्रस्तावावर सही केली आहे. त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पण अद्याप ते हाती लागलेले नाहीत. त्यातच आता ठाकरे सरकारने त्यांचं निलंबन केल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
डीसीपी सौरभ त्रिपाठी हे 2010 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. अंगडिया व्यावसायिकांकडून खंडणी वसुली प्रकरणात मागील आठवड्यात त्रिपाठी यांच्या गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी मुंबई पोलिसांनी त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवला होता. त्यानंतर हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे गेला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या प्रस्तावावर सही केली आहे. त्यामुळे त्रिपाठी यांच्या निलंबनावर शिक्कामोर्तब झाले आहे. आता त्रिपाठी यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात.