पुणे : शारजाहून आलेल्या प्रवाशांवर पुणे लोहगाव विमानतळावर कारवाई करत कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स विभागाने तब्बल ३ हजार हिरे जप्त केले आहेत.
या हिर्यांची किंमत तब्बल ४८ लाख ६६ हजार रुपये इतकी आहे. शारजा, अबुधाबीहून पुण्यात येणार्या आंतरराष्ट्रीय विमानातून यापूर्वी सोन्याची तस्करी केली जात असल्याचे वारंवार उघडकीस आले आहे. मात्र, अशा प्रकारे हिऱ्यांची तस्करी प्रथमच उघडकीस आली आहे.
ज्या प्रवाशाकडे हे हिरे आढळून आले, तो प्रवासी शारजाहून आला होता, एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकार्यांना याबाबतची माहिती मिळाली होती. त्यानुसार, अधिकार्यांनी शारजाहून येणार्या प्रवाशांची अधिक बारकाईने तपासणी केली. त्यात या प्रवाशांने पॅक केलेल्या सामानातील ट्राऊझर्सच्या पाऊचमध्ये हिरे लपवून ठेवले असल्याचे आढळून आले. हे हिरे ७५ कॅरेट वजनाचे असून त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत ४८ लाख ६६ हजार रुपये इतकी आहे. या प्रवाशाला अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.