रुपाली चाकणकर यांनी दिला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

0

पुणे : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादीकडून लवकरच नवीन महिला प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा होणार असून महिला आयोगाचं पद चाकणकर यांना मिळाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेण्यात आला आहे.

चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यपद सोडले. त्यानंतर महिला प्रदेशाध्यक्ष पद रिकामे होते. त्यामुळे रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीकडून महिला प्रदेशाध्यक्षा पद देण्यात आलं होतं. आता महिला प्रदेशाध्यपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाची सुत्र हाती घेताच अनेक मोठी प्रकरणं हाताळली आहेत. त्यामुळे त्यांचे ते काम पाहता त्यांना त्याच पदावर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रस्त्यावरची आंदोलनं ते भव्य व्यासपीठ आणि हजारोंच्या गर्दीत रुपाली चाकणकर यांचं वेगळेपण पाहायला मिळलं. विषयांची मुद्देसूद मांडणी, सडेतोड उत्तर, करारीपणा, कधी कोट्या करुन विरोधकांना नामोहरम करणं यासाठी रुपाली चाकणकर ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. लग्नानंतर सासरच्या चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे रुपाली चाकणकर यांचाही राजकारणात प्रवेश झाला. नगरसेविका ते प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. रुपाली चाकणकर यांची ओळख महिला प्रश्नावर लढणाऱ्या आणि पक्षाची बाजू खंबीरपणे मांडत विरोधकांना सडेतोड उत्तर देणाऱ्या नेत्या म्हणून आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पेललीय. आता त्यांच्यावर राज्य महिला आयोगाची भिस्त असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.