पिंपरी : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा येथील टोल नाक्यावर लक्ष वेदणारे फलक झलकताना दिसले. सोमटणे फाटा व वरसोली टोल नाक्यांमधील अंतर 60 किलोमीटर पेक्षा कमी आहे. त्यामुळे सोमाटणे हा टोल नाका बंद करावा अशी मागणी येथील जनसेवा विकास समितीने संस्थापक किशोर आवारे यांनी केली आहे.
जनसेवा विकास समितीचे कार्यकर्ते म्हणाले या टोलनाक्यावरील केंद्र आणि राज्य शासनाची टोल वसुली कधीच संपली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटल्या प्रमाणे 60 किलोमीटरच्या आत संबंधित टोलनाका येतो. त्यामुळं हा टोलनाका बंद झालाच पाहिजे. दरम्यान जनसेवा विकास समितीने याच टोल नाक्याच्या बाजूला “जाताय की राहताय… अजून किती टाळूवरच लोणी खाताय…” अशा आशयाचा बॅनर लावून टोल नाका हटलाच पाहिजे अशी आग्रही मागणी जनतेच्या निदर्शनास आणून दिली आहे.
काल जनसेवा समितीचे सदरचा टोलनाका बंद करण्याच्या मागणीसाठी पत्रकार परिषद घेतली होती. मागील वर्षात सदर टोलनाक्यावरील अरेरावी व स्थानिकांची होणारी लुट याविरोधात सर्व पक्षीय आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी स्थानिका टोलमाफी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात स्थानिकांची टोलसाठी पिळवणूक सुरु असल्याने जनसेवा विकास समितीने संताप व्यक्त केला असून तीन महिन्यात टोलनाका बंद न झाल्यास तिव्र जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.