चुकीचे गाळे वाटप थांबवा ; अन्यथा तीव्र आंदोलन : बाबा कांबळे

0
पिंपरी : कृष्णानगर येथील कस्तुरी मार्केट येथील टपरी, पथारी, हातगाडी धारकांना गाळे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. परंतु प्रत्यक्ष मात्र खऱ्या व्यवसाय करणाऱ्यांना गाळे वाटप करण्याऐवजी, स्वतःचा व्यवसाय न करणाऱ्यांना तसेच स्वतःचे लायसन काढून गाळे भाड्याने दिले आहेत. त्यांनाच गाळे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे प्रत्यक्ष व्यवसाय करणाऱ्या महिला पुरूषांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. त्यांनी या ठिकाणी गोंधळ करण्यास सुरुवात केली आहे. धनदाडग्यांना गाळे वाटप ; खरे फेरीवाले वाऱ्यावरच असल्याचा आरोप टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केला. चुकीचे गाळे वाटप थाबवा ; अन्यथा तीव्र आंदोलनचा बाबा कांबळे यांनी इशारा दिला.
या वेळी टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी घटनास्थळी सर्व फेरीवाल्यांना भेट दिली. त्यांचे प्रश्न समजून घेतले. क्षेत्रीय कार्यालय येथील अधिकारी भवरे यांच्यासोबत चर्चा केली. या वेळी जे खरे फेरीवाले आहेत, त्यांनाच गाळे वाटप करावे अशी मागणी केली.
टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीच्या वतीने फ क्षेत्रीय कार्यालयावर आंदोलन केले. या वेळी बाबा कांबळे बोल्ट होते. छाया जितेंद्र खुरंगळे, पूजा दादासाहेब कांबळे, आम्हाला पल्लवी प्रवीण दाखले, रत्नमाला गौतम नाही भांदन,  कविता कुमार थोरात,  सोनल भाऊसो फरकाटे, भाग्यश्री बंडू शेलार, सोना प्रभू वाघिरे, कावेरी मुकुंदर  काळ,  वंदना पवार, सारिका जोगदंड, सीमा विजय काळे आदी शिष्ठमंडळामध्ये उपस्थित होते.
बाबा कांबळे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेने फेरीवाला कायदा मंजूर केला आहे. या अंतर्गत शहरातील सर्व टपरी, पथारी, हातगाडी धारकांना सर्वे करून त्यांना पक्के गाळे देणे, पक्याच्या ठिकाणी लाईन पाण्याची व्यवस्था करणे आदी प्रक्रिया प्रलंबित आहे. परंतु महानगरपालिकेच्या वतीने मात्र ही प्रक्रिया पूर्ण न करता बेकायदेशीरपणे ज्यांच्याकडे लायसन आहेत व जे प्रत्यक्ष व्यवसाय करत नाहीत अशांना गाळे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केली. यास आमचा तीव्र विरोध असून प्रत्यक्ष जागेवर व्यवसाय करण्याचा खरा लाभार्थ्यांना गाळे मिळाले पाहिजे. अन्यथा ही प्रक्रिया आम्ही हाणून पाडू आणि तीव्र आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा या वेळी बाबा कांबळे यांनी दिला.
Leave A Reply

Your email address will not be published.