स्वतः पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वेशांतर करुन पकडला बनावट ‘पोलीस आयुक्त’

0

पुणे : स्वतः पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश असल्याचे सांगून, त्यांच्या नावाने खंडणी मागणाऱ्या भामट्याला सापळा रचून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही कारवाई करण्यासाठी स्वतः कृष्ण प्रकाश हे वेशांतर करून इतर अधिकाऱ्यांसोबत गेले होते.

रोषल बागल याला अटक केली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाने एक जण खंडणी उकळत असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर कृष्ण प्रकाश यांनी तातडीने आरोपीला जेरबंद करण्याचं ठरवलं. शहरातील एका हॉटेल मध्ये भेटण्याचे ठरले होते.

पोलीस दलातील काही अधिकारी, कर्मचारी यांच्या सोबत स्वतः पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश वेशांतर करुन आरोपी समोर बसले. आपण काम करवून घेण्यासाठी आलो असल्याचं भासवत त्यांनी आरोपीला रोख रक्कमही दिली. मात्र आरोपीने पैसे स्वीकारताच कृष्ण प्रकाश आपल्या मूळ रूपात आले आणि त्यांनी आरोपी रोषलला रंगेहाथ पकडले.

स्वतः पोलीस कृष्ण प्रकाश, शस्त्रविरोधी पथकाचे प्रमुख राजेंद्र निकाळजे, गुंडाविरोधी पथकाचे प्रमुख हरीश माने आणि इतर कर्मचारी यांनी हा सापळा रचला होता.

जमीनीचे बेकायदेशीर काम पोलीस आयुक्तांकडून करून घेण्यासाठी दोन लाखांची रक्कम मागितली होती. आरोपीने पैसे घेताच पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी त्यांची खरी ओळख सांगितली आणि त्याचे धाबे दणाणले.

Leave A Reply

Your email address will not be published.