इमारत कोसळून; कामगाराचा मृत्यू

0

पिंपरी : वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड येथे इमारत कोसळली आहे. या अपघातात ढिगा-याखाली दबून कामगाराचा मृत्यू झाला आहे. आज (शनिवार, दि.02) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. या इमारतीचे रिडेव्हलपमेंटचे काम सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की, वाल्हेकरवाडी रोडवरील एका इमारतीचा काही भाग आज दुपारी अचानक कोसळला आणि ढिगा-याखाली एक कामगार दबला. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि एक क्रेन दाखल झाली.

जवानांनी कामगाराला ढिगा-याखालून बाहेर काढण्यात आले पण, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. दुपारीची वेळ असल्याने इतर कामगार जेवण करण्यासाठी बाहेर गेले होते. या इमारतीचे रिडेव्हलपमेंटचे काम सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

दरम्यान, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.