आम आदमी पार्टी तर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये सदस्य नोंदणी अभियान

0

पिंपरी : आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड च्या वतीने आज मिस-कॉल द्वारे सदस्य नोंदणी आणि आप पिंपरी-चिंचवडच्या अधिकृत वेबसाईटचे प्रकाशन करण्यात आले.

पंजाब विधानसभा निकालानंतर आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे भ्रष्टाचार निर्मूलनाच्या मुद्द्यावर नऊ वर्षापूर्वी स्थापन झालेल्या आपने अल्पावधीत दोन राज्यांमध्ये एक हाती सत्ता हस्तगत केल्याने आपला देशभरातील सर्वसामान्य जनतेमध्ये आशा जागृत झाल्या आहेत.

पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना आपमध्ये सहजपणे सामील होण्यासाठी 903 906 906 5 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आपचे सदस्य बनता येणार असल्याचे आप पिंपरी चिंचवड चे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी जाहीर केले.

आम आदमी पार्टीच्या उपक्रमाची माहिती पिंपरी-चिंचवड करणला व्हावी या उद्देशाने aappimprichinchwad.org ता वेबसाईटचे प्रकाशन करण्यात आले.
ऑनलाईन मीटिंग च्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.