पिंपरी : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील शनिवारी झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॉलेंजर्स, बेंगलुरुच्या चालू सामन्यात मैदानात येणाऱ्या क्रिकेट ‘वेड्या’ तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
दशरत राजेंद्र जाधव (26, रा. केसुर्डी, ता. खंडाळा, जि. सातारा) याला अटक केली आहे. तर पोलीस हवालदार विनोद विलास साळवे यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार मौजे गहुंजे स्टेडीयम मधील नोर्थ वेस्टे स्टेंड सिटींग एरीया येथे शनिवारी रात्री सडे दहा ते पावणे आकाराच्या सुमारास घडला.
गहुंजे येथील एमसीए स्टेडीयमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी (रॉयल चॉलेंजर्स, बेंगलुरु) सामना सुरु होता. आरसीबी संघ फलंदाजी करीत असतांना दशरत जाधव हा सुरक्षा तारा ओलांडुन आतमध्ये गेला. आरसीबीचा विराट कोहली फलंदाजी करत असताना विराट सोबत हात मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या रोहीत शर्मा याचे दिशेने धावत गेला. आणि रोहित याच्याशीही हात मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी आत येऊन त्याला ताब्यात घेतले.
जाधव याला मैदानाबाहेर येत असतांना वादविवाद करुन गोंधळ घालुन तो पोलिसांच्या अंगावर आला. झटापट करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.