पिंपरी : आम आदमी पार्टीच्या पिंपरी चिंचवड सामाजिक न्याय विगच्या शहराध्यक्षावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा प्रकार फुगेवाडी येथे शनिवारी घडला आहे
या प्रकरणी यशवंत कांबळे यांनी फिर्याद दिली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आकाश गंगाधर मिसाळ, आदित्य संजय परदेशी आणि अनिकेत राजेंद्र तुपे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; कांबळे हे शनिवारी आप पार्टीचे पिंपरी येथील आंदोलन संपवून सांगवी येथे निघाले होते. दरम्यान फुगेवाडी येथील मीनाताई ठाकरे शाळेजवळ आल्यानंतर त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तपास भोसरी पोलीस करत आहेत.