पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून अत्याचार

0

पुणे : पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून एका अल्पवयीन मुलीवर अनोळखी व्यक्तीने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार पुण्यातील वाकड परिसरात घडला आहे. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीडित तरुणीच्या आईने वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी 25 वर्षीय अनोळखी व्यक्तीविरोधात IPC 376 सह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 3 व 4 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रहाटणी परिसरात फेब्रुवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यात घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 17 वर्षाची मुलगी घरात एकटी असताना, आरोपी पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसला. आरोपीने पीडित तरुणीला जबरदस्तीने मिठी मारुन तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. पीडित तरुणी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गोडे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.