भोंग्याचा विषय धार्मिक नाही सामाजिक आहे : राज ठाकरे

0

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. राज ठाकरे म्हणाले, मी 1 मे रोजी अर्थात महाराष्ट्र दिनी औरंगाबाद इथं जाहीर सभा घेणार आहे आणि त्यानंतर 5 मे रोजी आयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. अशा दोन घोषणा राज ठाकरे यांनी केल्या आहेत. तसेच यावेळी त्यांनी मशिदीच्या भोंग्यावर पुन्हा एकदा आक्रमक इशारा दिला आहे.

राज ठाकरे म्हणाले, आम्हाला कुठली ही दंगल नको. देशभरातल्या हिंदू बांधवांनी तयार राहावं. जर 3 तारखेला समजलं नाही तर या देशातल्या न्यायव्यवस्था कायदा या पेक्षा भोंगा मोठा वाटत असेल तर तसचं उत्तर द्याव लागेल, असा इशारा देताना भोंग्याचा मुस्लीमांना सुद्धा त्रास होतोय. देशभरातल्या लोकांना एवढंच सांगणं आहे हा भोंग्याचा विषय धार्मिक नाही सामाजिक आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

रामनवमी आणि हनुमान जयंतीनिमत्त काढण्यात आलेल्या शोभायात्रांवेळी देशातील काही भागांमध्ये हिंसक घटना घडल्या होत्या. या घटनांवरुन राज ठाकरे यांनी इशारा दिला आहे. तुमच्या हातात जे शस्त्र आहे ते आमच्या तरुणांच्या हातात द्यायला लावू नका. शोभायात्रांवर होणारे हल्ले थांबवा नाही तर आम्हीही जशास तसं उत्तर देऊ, असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.