मुंबई : कुर्ला येथील शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी कुडाळकर (42) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी (दि. 17) सायंकाळी घरात सर्वजण असताना रजनी यांनी बेडरूम मध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
रजनी या आमदार मंगेश कुडाळकर यांच्या द्वितीय पत्नी होत्या. काही वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीचे अपघाती निधन झाल्यानंतर मंगेश यांनी रजनी यांच्याशी विवाह केला होता. त्यांना दोन मुले आहेत. एक वर्षापूर्वी आमदार मंगेश यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला होता.
The body of Shiv Sena MLA Mangesh Kudalkar’s wife Rajani was found hanging at her residence. Senior police officials present at the spot: Mumbai Police
— ANI (@ANI) April 17, 2022
आमदार मंगेश हे नेहरूनगर येथील केदारनाथ मंदिर परिसरामध्ये राहतात. रविवारी सायंकाळी सर्वजण घरात असताना रजनी यांनी बेडरूम मध्ये जाऊन गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी रजनी यांचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यांनतर रजनी यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान घरगुती वादातून त्यांनी आपलं आयुष्य संपवलं असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.