धक्कादायक…दगडाने ठेचून नऊ वर्षाच्या मुलाचा खून

0

पिंपरी : चिखली परीसरात एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. दगडाने ठेचून एका नऊ वर्षाच्या मुलाचा खून करण्यात आला. ही घटना रविवारी (दि. 17) रात्री साडेआठच्या सुमारास उघडकीस आली.

लक्ष्मण देवासी (9, रा. हरगुडे वस्ती, चिखली) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण देवासी याचा मृतदेह एका पडक्या घरात आढळून आला आहे.

दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली. तो मूळचा राजस्थान येथील आहे. तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.