Tinder App वर ओळख ! पंचतारांकित हॉटेल मध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार

0

पुणे : महिला अत्याचाराची एक धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. पुण्यातील एका 23 वर्षीय तरुणीवर मुंबईत फिरायला नेऊन तिच्यावर बलात्कार केला. सगळ्यात गंभीर म्हणजे ऑनलाईन Tinder App वर पीडित तरुणी आणि आरोपीची ओळख झाली. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात आयपीसी IPC 376 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रावेत येथे राहणाऱ्या 50 वर्षाच्या राजेश सायनी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत कर्वेनगर येथे राहणाऱ्या 23 वर्षाच्या तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जानेवारी 2021 ते एप्रिल 2021 या दरम्यान घडला आहे. पीडित तरुणीने बुधवारी (दि.27) फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी राजेश सायनी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महिला पोलीस उपनिरीक्षक मीरा कवटीकवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी सायनी यांची टिंडर अ‍ॅपवर ओळख झाली. आरोपीने फिर्यादीला घटस्फोटीत असल्याचे खोटे सांगून आयुष्यभर तुझ्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तिला मुंबई येथे फिरायला घेऊन गेला. मुंबईत ताज फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घेऊन गेला. त्याठिकाणी तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मीरा कवटीकवार करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.