पुणे : पेट्रोल, डिझेल नंतर CNG च्या दरात वाढ होऊ लागली आहे. पुण्यात आज पुन्हा CNG च्या दरात 2.20 रुपयांची वाढ झाल्याने CNG चा दर 77.20 रुपये झाला आहे. आँल इंडिया पेट्रोल डिलर्स संघटनेचे अध्यक्ष अली दारुवाल यांनी ही माहिती दिली. सध्या इंधन दरवाढीवरून केंद्र व राज्य शासनात जुंपली असताना इंधनाच्या भावात होत असलेली वाढ ही राज्य शासनाची डोकेदुखी वाढविणारी आहे.
राज्य शासनाने काही दिवसांपुर्वी CNG वरील व्हॅट कमी केल्याने CNG चा दर 5 ते 6 रुपयांनी कमी झाला होता. मात्र याचा फायदा फार काळ वाहन चालकांना घेता आला नाही. मागील दिड महिन्यात तिसर्यांदा CNG च्या दरात वाढ झाली आहे. आज पुण्यात CNG चा दर 77.20 रुपये झाला आहे. रशिया – युक्रेन युद्धाची झळ सध्या सर्वत्र जाणवू लागली आहे. CNG चे दर लवकरच 80 पर्यत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे शहरात आज पेट्रोल 119.96 रुपये, डिझेल 102.37 तर सिएनजी 77.20 रुपये दर आहे.