आयुक्तांची “विनंती” हलक्यात घेऊ नका

गुन्ह्याचा तपास करताना मुळा पर्यंत जावा : पोलीस आयुक्त शिंदे

0

पिंपरी : पिंपरी चिंचवडचे नवीन पोलीस आयुक्त यांनी पहिली गुन्हे आढावा मीटिंग घेतली. या मीटिंग मध्ये सर्व अधिकाऱ्यांना थेट सूचना दिल्या आहेत. गुन्ह्याचा तपास करत असताना वरवरचा तपास नको तर गुन्ह्याच्या मुळाशी जाऊन तपास करावा असे आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले आहेत.

 

गुन्हे आढावा मीटिंगमध्ये सर्व पोलीस ठाण्याचे निरीक्षक, गुन्हे शाखा तसेच वेगवेगळ्या पथकांचे अधिकारी उपस्थित होते. नुकताच पदभार स्वीकारलेले पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गुन्हे आढावा मीटिंग घेतली. यामध्ये सर्व प्रथम सर्व अधिकाऱ्यांची ओळख करुन घेतली.

नवनियुक्त पोलिस आयुक्त अंकुश शिंदे हे आज झालेल्या गुन्हे आढावा मिटिंगमध्ये सर्व अधिकाऱ्यांना आदेश देताना अनेकदा “माझी विनंती आहे” असा शब्द वापरत होते असे अधिकाऱ्यांनी सांगितले. एखादा चुकीचा प्रकार खपून घेतला जाणार नाही हे सांगताना देखील ‘विनंती’ हा शब्द कायम होता. आयुक्त यांची ही विनंती हलक्यात घेऊ नका.. कारण ‘चुकीला माफी नाही’ हे त्यांच्या यापूर्वीच्या नियुक्तीच्या ठिकाणी केलेल्या कारवाई वरून दिसून येते. चुकीचे काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आयुक्त शिंदे यांनी घरचा रस्ता दाखविला आहे. त्यामुळे काम करताना अधिकाऱ्यांना विचार करावा लागणार आहे.

 

 

आजच्या मीटिंगमध्ये अधिकारी किती वर्षापासून आयुक्तालयात आहेत. कोणत्या ठिकाणी आता पर्यंत नोकरी केली. सध्या कार्यरत असणाऱ्या ठिकाणी किती दिवसापासून आहेत याची माहिती घेतली. त्यानंतर सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाखल गुन्हे, उघडकीस आलेले गुन्हे, उघडकीस न आलेले कारणे तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने केलेली कारवाई याची सविस्तर माहिती पोलीस आयुक्तांनी घेतली.

 

मीटिंग मध्ये सर्व माहिती घेतल्यानंतर पोलीस आयुक्तांनी काही सूचना, आदेश सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामध्ये शरीराविरोधातील गुन्हे तत्काळ दाखल करून घ्यावेत, 24 तासाच्या आत आरोपींवर योग्य कारवाई करण्यात यावी. नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांच्या तक्रारींचे योग्य निवारण करावे असे आदेश दिले आहेत.

सर्वात महत्वाच म्हणजे गुन्ह्याच्या तपासात होणारा वरवरचा तपास थांबवून गुन्ह्याच्या खोलात जाऊन तपास करावा. आरोपींना मोकाट सोडू नये असे आदेश दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.