पुणे : पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात पहाटेपर्यंत सुरु असलेल्या हॉटेल आणि बार वर समाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करुन 7 जणांवर सहकारनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 33 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी केतन किसन तापकिर, कुणाल किसन तापकिर, अभिषेक दत्तात्रय जगताप तसेच हुक्का सर्व्हिस देणाऱ्या 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शहरात पहाटे पर्य़ंत सुरु असलेल्या हॉटेल आणि बारमध्ये तरुणांच्या सुरु असलेल्या हुक्का पार्ट्यांमुळे शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने सामाजिक सुरक्षा विभागाला कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार 1 मे महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिन व रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर रात्री उशीरापर्य़ंत सुरु असलेल्या हॉटेल, बार यांना सुचना देण्यात आल्या होत्या.
शनिवारी रात्री उशीरापर्यंत सुरु असलेल्या हॉटेल्स बारवर तसेच हुक्का पार्लवर कारवण्यासाठी पुणे पोलीस दलात हजर झालेले 10 परिक्षाविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक व अंमली पदार्थ पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तपणे विशेष मोहिम राबवली. शनिवारी व रविवारी पहाटे दरम्यान पुणे शहरातील बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोटॅनिका, कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मॅश आणि रुफ टॉप व्हिलेज, वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जश्न आणि सुफीज आणि सहकार नगर पोलीस ठाण्यातील सायक्लॉन अशा वेगवेगळ्या हॉटेल्स बार वर कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करुन रात्री उशीरापर्यंत सुरु असलेल्या हॉटेल, बारवर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. यामध्ये धनकवडी येथील सरस्वती कॉम्प्लेक्समधील कॅफे सायक्लोन मध्ये मध्यरात्री 2.20 पर्य़त अवैधरित्या सुरु असलेल्या हुक्का बारवर छापा टाकून करावाई करण्यात आली. या कारवाईत 47 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन हुक्का पार्लरचा मालक केतन तापकिर (वय-26), कुणाल तापकिर (वय-29), बार व्यवस्थापक अभिषेक जगताप (वय-22) यांच्यासह हुक्का सर्व्हिस करणाऱ्या 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालीसामाजिक सुरक्षा विभागाकडील पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण डेंगळे पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर तसेच 10 परिविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक, सामाजिक सुरक्षा विभाग, अंमली पदार्थ विरोधी पथक एक चे पोलीस अंमलदार यांनी संयुक्तपणे केली आहे.