मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन सभा घेतल्यावर 1 मे ला औरंगाबादमध्ये सभा आणि 3 तारखेला राज्यभर महाआरतीची घोषणा केली होती. काल सभा झाली मात्र उद्याची महाआरती रद्द करण्यात आली आहे. याबाबत स्वत: राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करत माहिती दिली आहे.
उद्या रमजान ईद आहे, कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.