पिंपरी : विकसन करारनाम्यात बांधकामाची जागा महार वतनाची असल्याचा उल्लेख न करता बांधकाम व्यावसायिकाची फसवणूककेल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच पाच हजार चौरस फूट वाढीव बांधकाम करुन द्यावे किंवा 10 कोटी 85 लाख रुपयांची खंडणीदेण्याची मागणी करणाऱ्या दोघांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आयपीसी 420, 384, 34 नुसार चंदु लक्ष्मणदास रामनानी व किरण चंदु रामनानी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका 35 वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने रविवारी (दि.15) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनीचंदु लक्ष्मणदास रामनानी व किरण चंदु रामनानी (दोघे रा. प्लॉट नं. 8, सुखवानी पॅराडाईजचे समोर, पिंपरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखलकेला आहे. हा प्रकार 27 ऑगस्ट 2021 रोजी हिंजवडी फेज एक येथील परसीस्टंट कंपनीच्या बाजूला असलेल्या ज्युस सेंटरवर घडलाआहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. लिगसी टावर असोसिएट ही नंतर रुपांतर झालेली लिगसीटावर्स असोसिएट एलएलपी यांच्यातर्फे रावेत येथील सर्वे नं. 106 येथील 15 गुंठे क्षेत्रात बांधकाम केले जात आहे. आरोपी चंदु रामनानीव किरण रामनानी यांनी संगनमत करुन संबंधित जागा महार वतनाची असल्याचा उल्लेख न करता फिर्यादी यांची फसवणूक करण्याच्याउद्देशाने लवपून ठेवून 18 लाख रुपयांचे नुकसान केले.
विकसन करारनाम्यानुसार देय बांधकामापेक्षा वाढीव बांधकाम पाच हजार चौरस फूट किंवा 10 कोटी 85 लाख रुपयांची खंडणीमागितली. तसेच पोलिसांत तक्रार करण्याची आणि बँकेकडून करण्यात येणारे फायनान्स बंद करण्याची धमकी आरोपींनी दिल्याचेफिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप देशमुख करीत आहेत.