तरुणांनो तयारीला लागा…महाराष्ट्रात लवकरच 7 हजार पदांसाठी पोलीस भरती

0

मुंबई : महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात लवकरच मेगा पोलीस भरती होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ही भरती एकूण 7 हजार पदांसाठी असणार आहे.

महत्वाचे म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये 7 हजार पदांच्या भरतीनंतर राज्यात लवकरच आणखी एक मोठी भरती प्रक्रिया होणार असल्याची माहिती आहे.

राज्याच्या पोलिस दलातील मनुष्यबळ आणखी वाढणार आहे. राज्यात लवकरच मेगा पोलीस भरती होणार आहे. पोलीस कॉनस्टेबल पदासाठी ही भरती असणार आहे. विशेष म्हणजे कॉनस्टेबल पदासाठी एकाच वेळी ही सर्व प्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.