पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त
अंकुश शिंदे यांनी आणखी एक मोठा निर्णय घेत अनेक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘गॅस’वर ठेवले आहे.
आयुक्तालयातील अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना मुख्यालयाशी तडकाफडकी सलग्न केले आहे.
याबाबतचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी याबाबतचे आदेश काढले आहे. सलग्न करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ नेमणूकीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे आयुक्तालयातील पोलिसांचे धाबे दणाणले आहेत.
पोलीस अधिकारी/अंमलदाराचे नाव कंसात कोठून कोठे
1. पोलीस उपनिरीक्षक शाकीर जिनेडी (दरोडा विरोधी पथक ते मुख्यालय (आर.सी.पी.)
2. पोलीस हवालदार महेश दत्तात्रय खांडे (गुन्हे शाखा (खंडणी विरोधी पथक) ते मुख्यालय)
3. पोलीस नाईक नितीन बाळासाहेब लोखंडे (गुन्हे शाखा (खंडणी विरोधी पथक) ते मुख्यालय)
4. पोलीस नाईक प्रदिप गोरखनाथ गोडांबे (गुन्हे शाखा, खंडणी विरोधी पथक ते मुख्यालय)
5. पोलीस नाईक विवेक रमेश गायकवाड (सांगवी पोलीस स्टेशन ते मुख्यालय)
6. पोलीस हवालदार कुणाल दिलीप शिंदे (हिंजवडी पोलीस स्टेशन ते मुख्यालय)
7. पोलीस नाईक सचिन शरणप्पा सोनपेठे (चिंचवड पोलीस स्टेशन ते मुख्यालय)