रॅडिकलायझेशन आणि पिंपरी-चिंचवड

0

पिंपरी (रोहित आठवले) : शहर आयुक्तालयात महिन्याभरापूर्वी झालेल्या सिक्युरिटी रिव्ह्यू मीटिंगमध्ये पिंपरीचिंचवड परिसरातरॅडिकलायझेशन वाढत असल्याचे निरीक्षण नोंदविले गेले होते. त्यानंतर एटीएस ने अवघ्या काही दिवसात दापोडीत कारवाई करून, संशयिताला अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या युवकाला जम्मू काश्मीर मधील दहशतवादी संघटनेच्या बँक खात्यातून युवकाच्या खात्यात पैसे जमाझाल्याचे समजताच एटीएसकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

एटीएस आणि दिल्ली स्पेशल सेल ने दहशतवाद आणि नक्षलवादाशी संबंधाच्या संशयावरून किंवा थेट सहभाग उघड झाल्याने काहीजणांना यापूर्वी पिंपरीचिंचवड मधून अटक केली आहे. स्वतंत्र पोलिस आयुक्तालय झाल्यानंतर पण आयुक्तालयात चार वर्षानंतरहीएटीसीचे काम सुरू झालेले नाही तर पुण्यातील पीएटीसीचे काम थंडावले आहे. पूर्वी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी बोलाविले आहे असेम्हणले तरी अनेकांना भीती असायची. पण सध्या गुन्हेशाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना घर ते ऑफिस असा स्वतःचा प्रवासकरण्यासाठी गुगल मॅप ची गरज भासत आहे.

मात्र, सिक्युरिटी रिव्ह्यू मीटिंगमध्ये पिंपरीचिंचवड परिसरात रॅडिकलायझेशन वाढत असल्याचे निरीक्षण नोंदविले गेल्यानंतर स्थानिकपोलिस आणि वरिष्ठ अधिकारी या बाबत गंभीर असून, आवश्यक कार्यवाही त्यांनी महिन्यापूर्वीच हाती घेतली होती. राज्य आणि केंद्रसरकारला याबाबत याबाबत कळविण्यात आले होते.

त्यामुळे शहरात तपास यंत्रणांची अन्य कारवाईही येत्या काळात दिसून येऊ शकते.

पिंपरी चिंचवड चे सध्याचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. विशेष शाखेतील कर्मचाऱ्यांना ही बदलण्यात आले आहे. त्यामुळे मरगळलेल्या गुन्हे शाखेला आयुक्त आगामी काळात बळकटी देतीलअशी आशा आहे. त्याचबरोबर शहराची जाण असलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना मुख्य प्रवाहात आणून शहर शांत राहील असे नियोजनयेत्या काळात पाहायला मिळू शकते.

दहशतवादी कारवाया आणि पुणे जिल्हा असा विचार करताना एटीएसच्या (राज्य दहशतवाद विरोधी पथक) धर्तीवर पुण्यात स्पेशलऑपरेशन विंग सुरू झाले होते. कालांतराने राज्यभर हे विंग स्थानिक पोलिसांच्या अखत्यारीत सुरू करण्यासाठी त्याची पूनर्ररचनाकरताना त्याचे नामांतर एटीसी (दहशतवाद विरोधी सेल)

तर पुण्यात पीएटीसी असे झाले. या नामांतरानंतर राज्यात सर्वत्र एटीसी गुन्हेशाखेच्या अंतर्गत काम करत आहे. पण पुण्यात चारवर्षांपूर्वी आलेल्या अती उच्चपस्थ अधिकाऱ्यांनी गुन्हेशाखेच्या अंतर्गत असलेले पीएटीसी हे  स्पेशल ब्रांचला जोडले आणि त्याचे कामथंडावले असे अनेक अधिकारी सांगतात.

जंगली महाराज रस्त्यावरील साखळी बॉम्ब स्फोट, हैदराबाद बॉम्ब स्फोट, गुजरात बॉम्ब स्फोट, मुंबई साखळी स्फोटातील आरोपींचाप्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे पिंपरीचिंचवडचा यापूर्वी उघड झालेला संबंध विसरून चालणार नाही. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पुणेएटीएसला रिक्त जागेवर अधिकारी मिळाले आहेत. त्यामुळे एटीएसला मदत होईल या स्वरूपानेएटीसीने काम करण्याची गरजआहे.

(याबाबत ११ मे रोजी एक स्टोरी पेजवर पोस्ट केली होती. त्याची लिंक 👇 https://m.facebook.com/story.php?story_fbid=335973991970664&id=100066741965754&sfnsn=wiwspmo)

Leave A Reply

Your email address will not be published.