उद्योजक अविनाश भोसले यांना पुण्यातील मालमत्तेबाबत इडीकडून नोटीस

0

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम उद्योजक अविनाश भोसले यांना ईडीने पुण्यातील मालमत्ता रिकामी करण्याची नोटीस बजावल्याने भोसले यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सीबीआयच्या (सेंन्ट्रल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) अटक कारवाईनंतर आता ईडीने सुद्धा कारवाईचा धडाका सुरू केला असून गेल्या वर्षी मनी लाॅंन्ड्रींगप्रकरणी एजन्सीने जप्त केलेली मालमत्ता उद्योजक भोसले यांना रिकामी करण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले आहेत.

नेमके काय आहे हे प्रकरण?

उद्योगपती अविनाश भोसले यांच्या नावे असणाऱ्या काॅर्पोरेट कार्यालयाच्या एआरए मालमत्तेची साधारण चार कोटी रुपयांची जमीन गेल्या वर्षी ईडीने जप्त केली होती. दरम्यान, मालमत्तेच्या जप्तीला न्यायनिवाडा करणाऱ्या अधिकाऱ्यांची मान्यता सुद्धा प्राप्त झाली आहे, त्यामुळे ईडीने रीतसर याबाबत नोटीस बजावली असून संबंधित मालमत्ता रिकामी करण्यास सांगितली आहे, जेणेकरून तपास यंत्रणेचा तपास अधिक सुलभ होईल, मालमत्ता जप्त करता येऊ शकेल. भोसले अजूनही एबीआयएल (अविनाश भोसले इंन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड) चे प्रवर्तक आहेत, त्यामुळे त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

दरम्यान, अविनाश भोसले यांना येस बॅंक डीएचएफएल प्रकरणी अटक करण्यात आली असून यांना मंगळवारी सीबीआय कोठडी मंजूर झाली आहे. सीबीआय न्यायालयाने भोसले यांना 8 जून पर्यंत कोठडी सुनावली असून त्यांना अधिक तपासासाठी दिल्ली येथे नेण्यात आले आहे. मनी लाॅंन्ड्रींगप्रकरणाआधी फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट या संदर्भात सुद्धा इडीने भोसले यांची चौकशी करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.