राज्यसभा निवडणूक : भाजपने केले शिवसेनेला धोबी पछाड
सहाव्या जागेसाठी संजय पवार यांचा पराभव, धनंजय महाडिक विजयी
मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या निकाल 9 तासांच्या प्रतिक्षेनंतर समोर आला आहे. महाविकास आघाडीचे 3 उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सहाव्या जागेसाठी भाजपने शिवसेनेला धोबी पछाड केले आहे. याठिकाणी संजय पवार यांचा पराभव झाला असून धनंजय महाडिक विजयी झाले आहेत.
राज्यसभेचे दोन उमेदवार निवडून आणल्यानंतर भाजपकडे 28 मते राहत होती. पण, पियूष गोयल यांना 48 मतं मिळाली आणि अनिल बोंडे यांनाही 48 मतं मिळाली. त्यानंतर पहिल्या पसंतीची 27 मतं ही धनंजय महाडिक यांना मिळाली आहे. तर महाडिक यांच्याविरोधात उभे असलेले शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना 33 मतं मिळाली आहे. त्यामुळे अपक्षांची 9 मतं फुटली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. धनंजय महाडिक हे 41 मतं घेऊन विजयी झाले आहे. तर संजय पवार यांना 33 मतं मिळाली आहे.
भाजपकडे एकूण 106 आमदार आणि 7 अपक्ष समर्थक मिळून 113 आकडा होता. त्यामुळे 123 मते भाजपला पहिल्या प्राधान्याची मिळाली. यात 48 मते अनिल बोंडे आणि 48 मते गोयल यांना मिळाली. त्यामुळे एकूण 96 मतं झाली. त्यानंतर धनंजय महाडिक यांना 17 मते पहिल्या पसंतीची मिळाली. 27 पैकी 17 मते भाजपची होती. उरली 10 मते बाकी होती. यात 3 मतं बविआने महाडिक यांना दिली. 1 मत मनसेने दिलं. त्यानंतर 9 मतं अपक्षांची असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
पियूष गोयल 48
अनिल बोंडे 48
संजय राऊत 41
प्रफुल्ल पटेल 43
इम्रान प्रतापगढी 44
संजय पवार 33
धनंजय महाडिक 41
शिवसेनेचे नेते संजय राऊत, काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे नेते इम्रान प्रतापगढी विजयी झाले आहे.