विधानपरिषद : भाजप ५, राष्ट्रवादी २, शिवसेना २ आणि काँग्रेस १

भाजपनं केले 'माविआ'ला धोबीपछाड

0

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला होता. त्यानंतर आता भाजपाने विधान परिषदेत निवडणुकीत देखील माविआला धोबीपछाड दिला आहे. भारतीय जनता पार्टीचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येक दोन उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला असून दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण करता आला नाही.

भारतीय जनता पार्टीचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांच्यात चुरसीची लढत झाली. मात्र, भाजपाच्या प्रसाद लाड यांनी विजयी बाजी मारली. भाजपाला पहिल्या पसंतीची १३३ मतं मिळाली आहेत. दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत भाजपचे प्रसाद लाड विजयी झाले असून, त्यांना २८ मते मिळाली आहेत. दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीनंतर काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले असून, चंद्राकांत हंडोरे पराभूत झाले आहेत.

सरकार म्हणून विचार करण्याची गरज : बाळासाहेब थोरात
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, तीन मते फुटल्याचे समोर येत आहे. यावर, सरकार म्हणून विचार करण्याची गरज आहे. आमच्याच पक्षाची मते फुटल्याने इतरांना दोष देण्यात अर्थ नाही. आत्मपरिक्षण करणार असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली.

अत्यंत आनंदाची गोष्ट : देवेंद्र फडणवीस
विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीत मोठा गोंधळ आहे. समन्वय नाही. आमच्या पाचव्या उमेदवाराला मते मिळतील असा विश्वास होता. काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा जास्त मते आमच्या उमेदवाराला अधिक मते मिळाली. राज्यसभा निवडणुकीत १२३ मते घेतली होती विधान परिषदेच्या निवडणुकीत १३४ मते घेतली. आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी विजयाला हातभार लावला. त्यांचे आभार मानतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.