ठाकरे सरकारला धोका; शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे १३ आमदारांसह “सुरत”मध्ये

0

मुंबई: तीन पक्षाचे सरकार आल्यापासून वारंवार ठाकरे सरकार पडणार याची चर्चा असते. भाजपचे नेते वेगवेगळ्या तारखा देत असतात. मात्र काल झालेल्या विधान परिषद निवडणुकीनंतर आणखी एक मोठी घडामोड घडली आहे. शिवसेनेचे जेष्ठ मंत्री एकनाथ शिंदे १३आमदारांसह भाजपच्या छत्रछायेतील सुरतमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ठाकरे सरकार अडचणीत सापडले आहे. कोणत्याही क्षणी सरकार कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल काल सोमवारी (ता.२०) लागला. या निकालात महाविकास आघाडीला धक्का बसला असूनशिवसेनेतील अंतर्गत नाराजी नाट्य समोर आले आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने आपले दोन्ही उमेदवार विजयी करण्यातयश मिळवले आहे. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे आणि १३ समर्थक आमदार यांचे फोन नॉट रिचेबल असल्याचे समोरयेत आहे. आणि ते सर्व सुरत येथील ली मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याचेही समजत आहे. या सर्व प्रकारामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांची चिंता आणखी वाढली आहे.

दरम्यान,यासंदर्भात शिवसेनेने आज मंगळवारी (ता. २१) शिवसेनेची बैठक दुपारी बोलावण्यात आली आहे. या बैठकीला एकनाथ शिंदेहजर राहणार आहेत का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कॉंग्रेसला मतदान करण्यावरून शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. आणि फुटलेल्या मतांवरून शिवसेनेतच फूट पडली आहे. अशी माहिती समोर येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.