उद्धव ठाकरे यांचा नव्या सरकारला इशारा; पर्यावरण बिघडवणारे कोणतेही काम करू नका

0

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच मीडियासमोर आले. यावेळी पत्रकार परिषद घेताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्याचे बोलले जात आहे, ते चुकीचे आहे. शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत. सत्तेसाठी रातोरात खेळ खेळला जात आहे. मुंबईतील आरे कारशेडबाबत त्यांनी नव्या सरकारला इशारा दिला की, पर्यावरण बिघडवणारे कोणतेही काम करू नका.

उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्या हृदयातून महाराष्ट्र कोणीही काढू शकत नाही. लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. पण लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहीला नाही तर काय होईल? याप्रसंगी उद्धव ठाकरेंनी नव्या सरकारचे अभिनंदनही केले. पण त्याचवेळी महाराष्ट्र उद्धवस्त करू नका, असेही सुनावले.

सर्व काही पूर्वनियोजित होते – ठाकरे
आपण ज्याला मतदान करतो त्याला परत बोलावण्याचा अधिकार प्रत्येक मतदाराला असला पाहिजे. माझ्या पाठीत कसा खंजीर खुपसला हे सर्वांनी पाहिले. भाजपने मला दिलेले आश्वासन पूर्ण केले असते तर किमान अडीच वर्षे तरी त्यांचा मुख्यमंत्री झाला असता. महाराष्ट्रात सर्व काही आधीच ठरलेले होते.

मात्र महाराष्ट्रातील जनतेचा मी ऋणी आहे. मला वचन द्यायचे आहे की सत्तेसाठी मी कधीही विश्वासघात करणार नाही. सत्ता येते आणि जाते.

या पत्रकार परिषदेत उद्धव म्हणाले की, माझा राग मुंबईकरांवर काढू नका. मेट्रो शेडच्या प्रस्तावात बदल करू नका. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. ते म्हणाले की, काल जे घडले ते मी अमित शहांना अगोदरच सांगितले होते की, अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा आणि तेच झाले. हे आधी केले असते तर महाविकास आघाडीचा जन्म झाला नसता.

ज्या पद्धतीने सरकार बनवण्यात आले आहे आणि एका तथाकथित शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्री बनवण्यात आले, मी तेच अमित शहांना सांगितले होते. शिवसेना अधिकृत प्रकारे तुमच्या सोबत होती, पण हा मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) शिवसेनेचा नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.