माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी

0

पुणे : शिवसेना उपनेते तथा शिरुरचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांनी पक्ष विरोधी कारवाया केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.

आढळराव पाटील यांनी बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. यावर त्यांनी गज॔त राहील आवाज हिंदुत्वाचा अभिनंदन मुख्यमंत्री साहेब, असं म्हटलं आहे. तसेच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा कुठेही उल्लेख केलेला दिसत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.