बेपत्ता असलेल्या 15 वर्षीय मुलाचा खून; दारु पिताना झालेल्या वादातून घडलेला प्रकार

0

पिंपरी : मोशी येथून कालपासून बेपत्ता असलेल्या 15 वर्षीय मुलाचा खून झाल्याचे समोर आले आहे. त्याचा मृतदेह बनकर वस्तीमध्ये सापडला आहे. दारु पिताना झालेल्या वादातून मित्रांनीच धारदार हत्याराने वार करून खून केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून दोनजण फरार आहेत.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार खून झालेल्या मुलाचे नाव सुमित बनसोडे असे होते. काल सकाळपासून तो बेपत्ता होता. तसेच तो मोशीमधील बनकर वस्तीमध्येच राहत होता.

सुमितच्या आईने पोलिसांकडे बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी तपास करुन हा प्रकार उघडकीस आणला आहे. पोलिसांना सुमितचा मृतदेह सापडला आहे. सुमित आणि त्याचे मित्र दारू पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला आणि मित्रांनी सुमितच्या डोक्यात धारदार हत्याराने वार केले. यामध्ये सुमितचा मृत्यू झाला. तपास पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.