पोलीस आयुक्तांचे दणके सुरुच; सहाय्यक निरीक्षक आणि तीन अमलदारांची उचलबांगडी
नियंत्रण कक्ष, मुख्यालयाला संलग्न
पिंपरी : अंकुश शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदाच्या पदभार स्विकारलेल्या पहिल्या दिवसांपासून ‘बॅटिंग’ सुरु केली. वेगवेगळ्या प्रकरणात असणारे अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर थेट कारवाई केलेली आहे. दोन दिवसापूर्वीची अधिकारी, अंमलदार यांना संलग्न केलेले समोर असताना आज पुन्हा काहींना संलग्न केले आहे.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गुन्हे शाखा पथक बसखास्त करणे, चौकी पध्द्त बंद करणे, नागरिकांच्या तक्रारी घेण्यास टाळाटाळ करणे, चुकीच्या पद्धतीने कामकाज करणे, अवैध धंद्याना पाठबळ देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करत त्यांना नियंत्रण कक्ष, मुख्यालय, आरसीपी पथक, जलद गती पथकाला संलग्न केले तसेच निलंबन केले आहे.
आज गुरुवारी रात्री उशिरा म्हाळुंगे पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश निवृत्ती यमगर यांना तडकाफडकी पोलीस नियंत्रण कक्षाला संलग्न करण्यात आले आहे. तर त्याच चौकीचे सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय पोपट गुळीग यांना पिंपरी पोलीस ठाण्याशी संलग्न करण्यात आलेले आहे.
म्हाळुंगे चौकीचे अंमलदार अमोल बाळासाहेब बोराटे आणि शरद शांताराम खैरे यांना पोलीस मुख्यालयाशी तसेच अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अंमलदार विजय दीपक दौडकर यांनाही मुख्यालयाला संलग्न करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई (दणके) देणे सुरूच ठेवले आहे. यामुळे संपूर्ण पोलीस आयुक्तालयातील पोलिसांनी चांगलाच धसका घेतला आहे.