किरीट सोमय्या उद्धव ठाकरेंना ‘माफिया’ म्हणाले; शिंदे गट नाराज?

0

मुंबई : भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पूत्र नील सोमय्यांसह आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यानंतर फोटो ट्विट करुन किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना माफिया मुख्यमंत्री म्हटले. यावर शिंदे गटाने जोरदार आक्षेप नोंदवला आहे.

यावर स्पष्टीकरण देताना सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंनी मला, माझ्या कुटुंबाला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली होती.
नवनीत राणा यांना तुरुंगात टाकले होते. त्यामुळे मी त्यांना माफियाच म्हणतो, असे ते म्हणाले. तर केसरकर यांनी यावर आक्षेप घेत आमच्यात मतभेत असले तरी उद्धव ठाकरेंवर खालच्या भाषेत टीका करायची नाही असे ठरविलेले आहे.

किरीट सोमय्या जे बोलले आहेत ते आक्षेपार्ह आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी मी यावर संपर्क करण्याचा प्रयत्न केला,
परंतु होऊ शकला नाही. परंतु देवेंद्र फडणवीसांना आक्षेप कळवला आहे. त्यांना किरीट सोमय्यांना आवर घालण्यास सांगितले आहे. आमच्यात जे काही ठरले आहे, त्यानुसार भाजप नेत्यांनी वागावे, असे फडणवीसांना सांगितले असल्याचे केसरकर यांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.