पिंपरी : आळंदी नगराध्यक्षांच्या सुनेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. ही प्राथमिक माहिती आळंदी पोलिसांकडून आज मिळाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी भाजप नगरसेविका कमल घोलप यांची मुलगी होत्या.
प्रियांका उमरगेकर या आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या सूनबाई होत्या. त्यांनी राहत्या घरी काल संध्याकाळी 7 ते 8 वाजे दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शेजारच्यांनी पोलिसांना याबाबत कळवले. त्यामुळे पोलीस घटनास्थळी पोहोचले.
पोलीस पुढील तपास करत आहेत. मयत प्रियांका यांच्या पार्थिवाचे पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. मयत प्रियांका यांचे अभिषेक उमर्गीकर यांच्यासोबत काही महिन्यापूर्वी विवाह झाला होता.