मुंबई : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेमध्ये आमदारांपाठोपाठ खासदार फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शिवसेना खासदारांच्या दबाबपुढे अखेरील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माघार घेतली आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत NDA च्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली आहे.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या खासदारांनी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. अखेरीस उद्धव ठाकरे यांनी खासदारांच्या शब्दाला मान दिला आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा विरोध डावलून बहुतांश खासदारांच्या मागणीला प्राधान्य देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याचं वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
या संदर्भात शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून लवकरच अधिकृत माहिती जाहीर केली जाणार आहे. पण त्याआधीच संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन जनतेचा कौल लक्षात घेता एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्म यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला असल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे.
दरम्यान, राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी मातोश्रीवर सोमवारी शिवसनेच्या खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला शिवसेनेनं पाठिंबा दिल्यास शिंदे गटाशी चर्चेची दारं उघडी होतील, असं मत खासदारांनी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. खासदारांच्या या मागणीवर शिवसेना प्रमुखांनी मौन बाळगलं आहे. 18 जुलैला राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होवू घातली आहे. या निवडणुकीत NDAनं द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेनं द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा आता जाहीर केला आहे. लवकरच याबद्दल अधिकृत घोषणा होणार आहे. त्यामुळे शिवसेना आता महाविकास आघाडीतून बाहेर पडली का, अशी चर्चा रंगली आहे.