नवी दिल्ली : एकीकडे देशात कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असतानाच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 15 जुलैपासून 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त, सरकारने कोविडच्या बूस्टर डोसला प्रोत्साहन देण्यासाठी अमृत महोत्सवाच्या रूपात ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, 15 जुलैनंतर पुढचे 75 दिवस देशातील 18 वर्षांवरील नागरिकांना सरकारी लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस मोफत उपलब्ध करुन दिला जाणार आहे.
ज्या व्यक्तींनी कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत आणि त्यांना दोन्ही डोस घेऊन सहा महिने किंवा त्याहून अधिक वेळ झाला असेल अशा व्यक्ती बूस्टर डोस घेऊ शकतात. त्यासाठी त्यांना जवळच्या खाजगी लसीकरण केंद्रावर बूस्टर डोससाठी नोंदणी करावी लागेल.