७२ कोटींच्या बनावट खरेदी बिलांचा वापर करुन फसवणूक करणाऱ्या इनपुट टॅक्स क्रेडिट पथकाच्या जाळ्यात

0

पुणे  : पुण्यात महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने जवळपास ७२.६८ कोटींच्या बनावट खरेदी व विक्री बिलांच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडीट घेऊन व तसेच टॅक्स क्रेडीट पास ऑन करून शासनाचा १३.०८ कोटींच्या कर महसुलाची हानी करणाऱ्या व्यापाऱ्यास अटक केली आहे .

वस्तू व सेवाकर विभागाकडील उपलब्ध विविध विश्लेषण प्रणाली च्या आधारे सखोल विश्लेषण करून सदर करचोरीचा शोध घेण्यात आला . मे . शिव स्टील ट्रेडर्स या व्यापायाच्या विरोधात महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून करचोरी विरोधात विशेष अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती.

वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलासंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत दौलत शिवलाल चौधरी यांना दि .१३ रोजी अटक करण्यात आली आहे.मुख्य न्यायदंडाधिकारी , पुणे यांनी सदर व्यक्तीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे .

सदर धडक कारवाई श्रीमती रेश्मा घाणेकर , राज्यकर सहआयुक्त , पुणे व  सुधीर चेके, राज्यकर उपायुक्त, अन्वेषण, यांच्या मार्गदर्शनाखाली सहा . राज्यकर आयुक्त , अन्वेषण  हृषीकेश अहिवळे , चंदर कांवळे , प्रदीप कुलकर्णी ,श्रीकांत खाडे व अन्वेषण विभागातील राज्यकर निरीक्षक यांनी राबवली . संपूर्ण कारवाई दरम्यान धनंजय आखाडे , अप्पर राज्यकर आयुक्त , पुणे क्षेत्र , पुणे यांचे मार्गदर्शन मिळाले.

सर्वसमावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करून आणि इतर विभागांशी समन्वय साधून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग कर चुकवेगीरी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा कसून शोध घेत आहे . या मोहीमेद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाद्वारे या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत २७ अटक कारवाया करण्यात आल्या आहेत व याद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचोरी करणाऱ्या व्यापाऱ्यांना एक प्रकारे इशारा दिलेला आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.